आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Permission To File Case On Kripashankar, Mumbai Police Write Letter To Assembly Chairman

कृपाशंकरांवर खटला चालवण्याची परवानगी द्या, मुंबई पोलिसांचे विधानसभा अध्‍यक्षांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी मुंबई पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवले आहे. याबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.
22 फेब्रुवारी 2012 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना जमीन हडल्याप्रकरणी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.
ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याने सिंग आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच या प्रकरणात सिंग व त्यांच्या कुटुंबीयांची पोलिसांची कसून चौकशी केली होती. सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपांच्या बेहिशेबी संपत्तीविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच त्यांचे व झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या अर्थिक हितसंबंध असल्याचा दावा त्यांनी
याचिकेत केला होता. दरम्यान, या प्रकरणानंतर कृपाशंकर यांच्या राजकीय कारर्किदीला काही वर्षांसाठी ब्रेक लागला आहे. तसेच त्यांचे काँग्रेसमधील वजन काहीसे घटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कुटुंबीयांची चौकशी
बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांना आदेश देत कृपाशंकर सिंह यांच्या पत्नी, मुलगा त्याची पत्नी आणि मुलीच्या नावावर किती संपत्ती आहे, याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सिंह यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, तेथेही त्यांची याचिका फेटाळली.