आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी अस्वस्थता! अन्यथा वेगळा विचार करू, मित्रपक्षांची फडणवीस सरकारला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनानुसार सत्तेत १० टक्के वाटा द्या, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड इशाराच सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांनी शनिवारी सरकारला दिला. घटकपक्षांची आक्रमकता पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांची बैठक घेतली.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यात मित्रपक्षांना सामावून घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. केंद्रीय नेतृत्वाशी यावर चर्चा सुरू असून हिरवा कंदील मिळताच मित्रपक्षांना स्थान देऊ, असेही ते म्हणाले. तथापि, मित्रपक्षांतील या अवकाळी
अस्वस्थतेमागे वेगळी कारणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप व शिवसंग्राम संघटना या मित्रपक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन हा इशारा दिला.
नेत्यांची बैठक मुंबईतील वांद्रे परिसरात एमआयजी क्लबमध्ये झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत रिपाइंचे अध्यक्ष आणि बैठकीचे समन्वयक रामदास आठवले यांनी चारही मित्र पक्षांची भुमिका स्पष्ट केली. मित्रपक्षांच्या या आक्रमक भुमिकेनंतर लगोलग मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. या वेळी मित्रपक्षांनी सत्तेतील वाटा मिळत नसल्याने कार्यकर्त्यांच्या स्तरावरील पक्षांतर्गत अस्वस्थेतेची कल्पना त्यांना
दिली.

पुढे वाचा, विरोधी भूमिका नाही, भाजपने शब्द पाळावा