आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Urgent Base 3 K For Solving Problem Drought

तीन हजार कोटी द्या; मुख्यमंत्री-पंतप्रधानांमध्ये चर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील दुष्काळाबाबत शुक्रवारी रात्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या वेळी राज्य सरकारतर्फे दुष्काळावर तातडीची उपाययोजना म्हणून केंद्राकडे 3,000 कोटी रुपयांचे पॅकेज मागितले आहे. तसेच एका वर्षात पूर्ण होऊ शकणार्‍या जलसिंचनाच्या कामांसाठीही वेगळा निधीही मागण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी मुंबईत आल्यानंतर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दुष्काळ, पुणे बॉम्बस्फोट व इतर विषयांचा आढावा घेतला. राज्यात काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असून त्यावर उपाययोजना म्हणून पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा देण्याची गरज आहे. तसेच टंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवणेही गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावर पंतप्रधानांनी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विकास कामांबाबतही चर्चा केली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला असताना मुंबईच्या विकास कामांबाबत एक सादरीकरण पंतप्रधानांकडे केले होते. त्याबद्दल पंतप्रधानांकडे त्यांनी या वेळी पाठपुरावा केला.
स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू- इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्याबाबतचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत हे स्मारक उभारण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलू, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी त्यांची राजभवन येथे भेट घेतली. आपण केंद्रीय वस्त्रोद्योग व पर्यावरण मंत्र्यांशी तातडीने चर्चा करून जागेचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.