आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Global Crisis Forces Reverse Migration By Up To 30%' ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदीमुळे मायदेशी परतणा-या भारतीयांची संख्या 30 टक्क्यांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक आर्थिक मंदीची वाढती चिंता आणि बेरोजगारी वाढत असल्याच्या अहवालांमुळे मायदेशी परतणा-या परदेशातील भारतीयांची संख्या 30 टक्क्यांहूनही वर गेली आहे. अमेरिका, कॅनडा ऑस्टेÑलिया आणि युरोपसह जगभरात वास्तव्यास असलेले 25 ते 30 टक्के भारतीय मायदेशी परतू इच्छित आहेत. आर्थिक मंदीपूर्वी मायदेशी परतू इच्छिणा-यांचे प्रमाण अगदीच नगण्य होते.
भारतीय कंपन्या चांगल्या वेतन देऊ लागल्या आहेत. भारतात काम करण्यामुळे जागतिक एक्स्पोजरही मिळते. शिवाय मायदेशी परतल्यामुळे आपल्या कौशल्याला चांगली किमत मिळेल व भावी करिअर उज्ज्वल होईल, अशी भारतात परतू इच्छिणा-यांची मुख्य धारणा आहे, असे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेचे (आयएमआय) प्राध्यापक सतीश के. कलरा यांनी म्हटले आहे.
पाश्चिमात्य देशांत जाऊन नोकरी करण्याची भारतीयांची इच्छा असते, परंतु सध्या पाश्चात्त्य राष्ट्रांपुढे त्यांच्याच नागरिकांना रोजगार देण्याचे मोठे संकट उभे ठाकले असल्यामुळे तेथील रोजगाराच्या संधींची व्याप्ती कमी होत चालली आहे, असे अपना सर्कल डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश बन्सल यांनी म्हटले आहे. भारतात आयआयटी आणि आयआयएमसारख्या जागतिक दर्जाच्या शिक्षण देणा-या संस्था आणि मायदेशी काम करण्यामुळे सांधले जाणारे भावनिक ऋणानुबंध याबरोबरच बांधकाम, जैवतंत्रज्ञान, बांधकाम, तेल- वायू क्षेत्रातील कंपन्याच्या प्रगतीचा वाढता आलेख याबाबी जागतिक आर्थिक असुरक्षिततेच्या वातावरणात परदेशस्थ भारतीयांना खुणावू लागल्या आहेत.