आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य आणि समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा अमेरिकास्थित ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’तर्फे गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुण साधू,ज्येष्ठ साहित्यिक - Divya Marathi
अरुण साधू,ज्येष्ठ साहित्यिक
साहित्य आणि समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा अमेरिकास्थित ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’तर्फे शनिवारी पुण्यात गाैरव हाेणार अाहे. यंदाच्या सन्मान प्राप्त व्यक्तींशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद...
 
आपल्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात ठसा उमटवणारे, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले विचारवंत साहित्यिक अरुण साधू यंदाच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या जीवनगौरव सन्मानाचे मानकरी आहेत. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘या सन्मानासाठी माझी निवड झाल्याने मला अतिशय आनंद झाला. हा पुरस्कार म्हणजे मोठा सन्मान आहे, याचे महत्त्व मी जाणून आहे,’ असे सांगून ते म्हणाले,‘हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील आणि मराठी वाचणाऱ्या इतर देशांतील, प्रांतांतील वाचकांनी माझ्या लेखनाला दिलेली पावती आहे, असे मी मानतो. अनेकदा जीवनगौरव पुरस्कार हे लेखक-कलावंतांना करिअर संपताना देण्याची प्रथा आहे, अशी एक समजूत दिसते. परंतु, मला मात्र फाउंडेशनच्या या सन्मानाने पुढेही लेखन करत राहण्याची चालना देण्यासारखे वाटतेे. उतारवयात मिळालेल्या या सन्मानामुळे लेखन चालू ठेवण्यासाठी एकप्रकारे उत्तेजन मिळाले आहे,’ असे साधू म्हणाले.  तर अंजली जाेशी, अतुल पेठे अाणि अिनलकुमार साळवे या पुरस्कार प्राप्त इतर मान्यवरांनीही साहित्यासह या पुरस्काराबद्दल व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दांत..

अरुण साधू,ज्येष्ठ साहित्यिक
 
महाकादंबरीचा प्रकल्प सुरू
काही दिवसांपासून मी महाकादंबरीच्या लेखनात आहे. गेल्या ३० वर्षांत जीवनशैली विस्मयचकित वेगाने बदलते अाहे.जागतिकीकरण, उदारीकरणासोबत राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग.. प्रत्येक क्षेत्रात गतीने बदल घडत आहेत. या भयानक वेगामागची कारणे काय, नवी संशोधने, संगणकीकरण, यांत्रिकीकरण, नवे तत्त्वविचार, नव्या विचारसरण्या..हे सारे नाट्यमय बदल आहेत. आता पुढे काय, आगामी दहा वर्षांत तर याहून गतीने हे सारे बदलणार आहे, असे बोलले जात आहे. या साऱ्याचा समग्र वेध घेण्याचा प्रयत्न लेखक या नात्याने इतर लेखक जसे करतात, तसा मीही माझ्या परीने करत आहे. कादंबरीच्या अनुषंगाने संशोधन, दाखले, इतिहास, ताज्या घडामोडी..यांच्याविषयी माहिती जमवणे, संदर्भ शोधणे सुरू आहे. केवळ सुचले की लिहिले, असे होत नाही. लेखनाआधी बरेच काही घडत असते. ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सन्मानाने हे सारे करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाली, असे मी म्हणेन.
 
पुढिल स्लाइडवर वाचा अंजली जाेशी, लेखिका
बातम्या आणखी आहेत...