आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा-बोरिवली बसला भीषण अपघात, दोन ठार तर 35 प्रवासी जखमी, बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी- गोवा-मुंबई महामार्गावर राजापूर वाटूळजवळ एका खासगी बसला काल रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईला ही बस परत येत होती. अपघात एवढा भीषण होता की एका प्रवाशाचा जागीच तर दुसऱ्या प्रवाशाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातात 32 प्रवासी जखमी झाले आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास खासगी बस वेगाने जात होती. रत्नागिरीतील राजापूर वाटूळजवळ चालकाने नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. यात एका प्रवाशाच्या जागीच मृत्यू झाला. एका प्रवासी गंभीर जखमी झाला होता. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचे प्राण गेले.
 
या अपघातात एकूण 32 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील लांज्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील अनेक भाविक कोकण आणि गोव्याला जात आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात बेकायदेशीर वाहतूकही सुरु झाली आहे. या अपघाताला ही बेकायदेशीर वाहतूक कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
 
पुढील स्लाईडवर बघा, या भीषण अपघाताचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...