आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात \'बीफ\'चा तुटवडा भासू देणार नाही; CM मनोहर पर्रीकर यांचे विधानसभेत आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात 'बीफ'चा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. - Divya Marathi
राज्यात 'बीफ'चा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले.
पणजी- राज्यात 'बीफ'चा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले आहे. देशभरात बीफबंदीचा वाद चिघळलेला असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपची गोची होण्याची शक्यता आहे. 
 
भाजप आमदार काब्राल यांनी उपस्थित केला प्रश्न
कुड़चडेचे भाजप आमदार नीलेश काब्राल यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी कर्नाटकातील बेळगाव येथून बीफ आयात करत आहोत, यापुढेही करत राहू असे स्पष्ट केले. भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये बीफबंदीचा पुरस्कार केला जात असताना गोव्याने मात्र त्याविरोधात भूमिका घेतली. आता तर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विधानसभेतच हमी दिली आहे.