आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात पुन्हा धार्मिक स्थळांची मोड-तोड; काँग्रेसने केली सीबीआय चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अज्ञात हल्लेखोरांनी चर्च आणि कब्रस्तानातील मालमत्तेचे नुकसान केले. - Divya Marathi
अज्ञात हल्लेखोरांनी चर्च आणि कब्रस्तानातील मालमत्तेचे नुकसान केले.
पणजी - गोव्यात धार्मिक गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांच्या तोडफोडीवरून तणाव निर्माण झाला होता. धार्मिक स्थळांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला तरीही रविवारी याची पुनरावृत्ती घडली आहे. ख्रिस्ती आणि हिंदूंच्या तुळशी वृंदावनाची नासधूस केल्यानंतर रविवारी रात्री दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे गार्डियन एंजल्स चर्चच्या दफनभूमी मधील क्रॉस, थडगी आणि इतर मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी विरोधी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 
 
 
नाईक यांनी सोमवारी पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. गोवा पोलिसांकडून विशेष सतर्कता ठेऊनही हे प्रकार थांबले नाहीत. गोवा पोलिस सक्षम असले तरी स्थानिक परिस्थितीचे दडपण त्यांच्यावर येऊ शकते. त्यामुळे सीबीआयकडून या घटनांची निःपक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे, असे आवाहन शांताराम नाईक यांनी केले आहे. 
 
 
सीसीटीव्हीत टिपला आरोपी
पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी या प्रकरणात पोलिस लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले. रविवारी रात्री घडलेल्या प्रकरणात एक व्यक्ती दफनभूमीबाहेर जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरातून उघड झाले आहे आणि त्या दृष्टीकोनातून तपास सुरू आहे. या प्रकारांना लवकरच आळा घालून दोषींना ताब्यात घेतले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...