आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रिकर नवे संरक्षणमंत्री? उद्या देणार CM चा राजीनामा, UP मधून राज्यसभेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी/ नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. येत्या रविवारी पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. सोमवारी ते (10 नोव्हेंबर रोजी) ते उत्तरप्रदेशमधून राज्यसभेवर जाण्यासाठी अर्ज दाखल करतील. पर्रिकर यांनी आज पणजीत आपल्या आमदारांची बैठक घेतली व ताज्या घडामोडींची माहिती दिली. पर्रिकर यांनी शनिवारी दुपारी आपण राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. शनिवारी 12 वाजता मुख्यमंत्रीपदासाठीचा नवा नेता निवडला जाणार आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत नवा मुख्यमंत्री शपथ घेईल असे सांगितले आहे. सध्या संघाच्या पसंतीचे आमदार व विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र अर्लेकर यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. याचबरोबर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा व आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. केंद्रात पर्यटन राज्यमंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांचेही नाव पुढे येऊ शकते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 24 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वीच मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू इच्छित आहेत. मोदी आज आणि उद्या (7, 8 नोव्हेंबर) आपल्या लोकसभा क्षेत्रात वाराणसी दौ-यावर आहेत. त्यानंतर ते 11 नोव्हेंबरला आशियन समेटसाठी मान्यमारला जाणार आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानही ते विदेशी दौ-यावर असणार आहेत. त्यामुळे रविवारीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे मोदींनी योजले आहे.
12 ते 15 मंत्री घेऊ शकतात शपथ- मोदी यांनी 26 मे रोजी शपथ घेतली त्यावेळी मोदींसह 46 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र पाच ते सहा मंत्र्यांकडे तीन पेक्षा अधिक खात्याचा भार आहे. अधिक खाते असल्याने त्या मंत्र्यांचा वेळ वेगवेगळ्या खात्यासाठी जात आहे. यामुळे आपापल्या खात्यांना ते न्याय देऊ शकत नाहीयेत. त्यामुळे संबंधित खात्यांना पूर्णवेळ मंत्री देण्याचे मोदींनी ठरवले आहे. त्यानुसार किमान 12 जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून कळते आहे. यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, बिहारमधून गिरिराज सिंह, राजीव प्रताप रूडी, मुख्तार अब्बास नक्वी, राजस्थानमधून सोनाराम, झारखंडमधून जयंत सिन्हा, हिमाचलमधून जेपी नड्डा, महाराष्ट्रातून हंसराज आहीर, शिवसेनेच्या कोट्यातून अनिल देसाई, चंद्रकांत खैरे किंवा आनंदराव अडसूळ, याचबरोबर सुरेश प्रभूंचे नावही आघाडीवर आहे. हरयाणातून वीरेंद्र सिंग यांच्यासह पंजाबी एसएस अहलूवालिया यांना संधी मिळू शकते. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला आणखी एक कॅबिनेट खाते दिले जाणार आहे.