आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOA Beach वर सापडली होती या तरुणीची सेमीन्युड बॉडी, गळ्यात होती बिकिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ब्रिटिश तरुणी स्कार्लेट एडन किलिंगचा रेप आणि खून या प्रकरणातून गोव्याच्या स्थानिक न्यायालयाने सॅमसन डिसुजा आणि प्लॅसिडो कार्वाल्हो यांची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे. हे दोघे बीचवर काम करायचे. गोव्यातील अंजुना बीचवर स्कारलेटचा सेमी न्युड मृतदेह सापडला होता. तिच्या गळ्यात बिकिनी गुंडाळेली होती. तिच्या शरीरावर 50 जखमा आढळून आल्या होत्या.
आई, भावंडांसह भारतात आली होती स्कारलेट
- मृत्यू होण्यापूर्वी स्कारलेटने मद्यपान केले होते, हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर ठिकठिकाणी तब्बल 50 जखमा होत्या. आई आणि सात भाऊ-बहिणींसह ती 2007 मध्ये भारत भ्रमणावर आली होती.
- फेब्रुवारी 2008 पर्यंत ती कर्नाटकात राहिली. या दरम्यान तिने तिच्या आईला गोव्यात व्हॅलेंटाईन डे पार्टी करण्यासाठी राजी केले होते.
- तिने बॉयफ्रेंड ज्युलियो लोबोसोबत ही पार्टी अटेंड केली होती. पण तेव्हा तिचे कुटुंबीय कर्नाटकातच होते. दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह सापडला.
दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम
- गोवा पोलिसांनी हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे स्कारलेटचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचे अहवाल पोलिसांनी दिली होता. पण तिच्या आईने अभियान चालवून पुन्हा शवविच्छेदन करायला लावले.
- त्यात आढळून आले होते, की स्कारलेटने मद्य प्राशन केले होते. रेप करुन तिची हत्या करण्यात आली होती. तिच्या शरीरावर 50 जखमा होत्या हेही यात स्पष्ट झाले होते.
- तिला समुद्रात बुडवून ठार मारण्यात आल्याचे कारण यात दिले होते. याचा आरोप दोघांवर ठेवण्यात आला होता.
प्रत्यक्षदर्शीने बलात्कार होताना बघितला होता
- या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी मुरली सागरने कोर्टात सांगितले होते, की स्कारलेटला कार्वल्होसोबत ड्रग्ज घेताना बघितले होते.
- ब्रिटिश प्रत्यक्षदर्शी मानियन हिने कोर्टात सांगितले होते, की दोन आरोपींपैकी एकाला स्कारलेटवर बलात्कार करताना बघितले होते.
- स्कारलेटच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार ही केस सीबीआयला सोपवण्यात आली होती. 2010 मध्ये सीबीआयने चौकशी पूर्ण करुन आरोपपत्र दाखल केले.
पुढील स्लाईडवर बघा... घटनेशी संबंधित फोटो... आणि स्कारलेटचे इतर फोटो... हे आहेत आरोपी....
बातम्या आणखी आहेत...