आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इफ्फी’त यंदा दहा मराठी चित्रपट; कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट चित्रपटांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गाेव्यात हाेणाऱ्या ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा राज्य शासनातर्फे दहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा साेहळा हाेत अाहे.यात कट्यार काळजात घुसली, नटसम्राट-असा नट होणे नाही, सैराट, हलाल, कोती, सहा गुण, बर्नी, डबल सीट, हाफ तिकीट, दगडी चाळ या चित्रपटांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्यावर्षी पासून मराठी चित्रपट पाठविण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली. गेल्या वर्षी २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पणजी येथे पार पडलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नऊ मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले अाहे.

अांतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठीचा झेंडा
या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता प्राप्त झालेल्या २७ चित्रपटांचे परीक्षण केल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १० मराठी चित्रपटांची निवड केली.
बातम्या आणखी आहेत...