आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील दोन मंत्री व चार आमदारांच्या परदेश दौ-याचा खर्च आला 6.20 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्यातील दोन मंत्री आणि चार आमदारांनी गेल्या दोन कमीत कमी 20 देशांची परदेशवारी केली आहे. या परदेशवारीचा खर्च राज्यातील तिजोरीतून करण्यात आला आहे. गोवा सरकारनेच ही माहिती गोवा विधानसभेत दिली आहे. त्यानुसार पर्यटनमंत्री दिलीप पारुलेकर आणि उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी पर्यटनसंबंधी आयोजनात सहभागी होण्यासाठी विविध देशांची सैर केली होती.
विधानसभा उपाध्यक्ष अनंत शेत, गोवा पर्यटन विकास निगमचे चेअरमन नीलेश काबरल, भाजप आमदार गणेश गांवकर आणि सुभाष फलदेसाई यांनीही परदेशवारी केल्याचे सांगण्यात आले. या सर्वांनी सरकारी खर्चाने प्रवास केला. एकून प्रवास खर्चातील सुमारे 3 कोटी 36 लाख रूपये एकट्या पर्यटनमंत्री पारुलेकर यांनी खर्च केले आहेत.
दुबई, एडनबर्ग, लीड्स, ब्रिटन, लॉस एंजिल्स, न्यूयॉर्क, इस्तांबुल आणि तुर्की येथे हा प्रवास केला आहे. पर्यटन कंपनीच्या एजंटांना आता या सर्वांची शिकागो, अमेरिका, एम्सटरडम आणि नेदरलँड दौ-यातील बिले जमा करण्यास सांगितले आहे. म्हणजेच तो खर्च वेगळा असून परदेसवारीवरील सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे.