आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत गोव्यातील सुंदर अन् पर्यटकांनी फुललेले बीच, पाहा फोटो...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हगेटिर बीच... - Divya Marathi
व्हगेटिर बीच...
मुंबई- गोवा हे देशातील एक छोटसं पण टूमदार राज्य आहे. या राज्याला एका बाजूला संपूर्णपणे समुद्र किनारा लाभला आहे. गोव्यात सुमारे 40 सुंदर बीचेस , किनारे आहेत. गोवा शांतिप्रिय पर्यटकांना आणि तरूण जोडप्यांना आकर्षित करतो. गोवा हे समुद्र आणि नदीचे एक यांचा अद्धभूत संगम आहे. नारळाची झाडे आणि समुद्रातील पाण्यावर पडणा-या सुर्यकिरणांचा प्रकाश गोव्याच्या सौदर्यात चार चांद लावतात. गोव्यात अनेक सुंदर किनारे बीचेस आहेत. त्यातील प्रमुख बीचेसवर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत.

बागा बीच-
हा बीच गोव्यातील सर्वात लोकप्रिय बीच म्हणून ओळखला जातो. पर्यटक या बीचवर रात्र-दिवस दिसतात. बीच पार्टी, नाईटलाईफ आणि सी-फूडसाठी हे बीच ओळखला जातो. येथे अनेक सुंदर अशी हॉटेल आणि रेस्टांरंट आहेत. बागा बीचवर पामची झाडे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. समुद्रातील मासे पकडणे, समुद्र किनारी तापलेल्या वाळूत लोळणे आणि पॅडल बोटसाठीही प्रसिद्ध आहे. या बीचवर जानेवारी ते मार्च दरम्यान विंड सर्फिंगचा आनंद लुटला जातो. येथेच दरवर्षी राष्ट्रीय विंड सर्फिंग स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाते.
अगोंडा-

आशियातील सर्वात सुंदर बीच असलेल्या अगोंडा बीच शांत व स्वच्छ म्हणून ओळखला जातो. अगोंडा बीचवर पर्यटक शांततेत उन्हाचा आनंद लुटतात. इतर बीचच्या तुलनेत येथे कमी गर्दी दिसते. त्यामुळे एकटे असणारे व वाचन करणारे पर्यटक येथे थांबण्यास पसंती देतात.
कॅडोलिम बीच-
कॅंडोलिम बीच उत्तर गोव्यात आहे. पणजीपासून हा बीच 12 किमीवर दूर आहे. गोव्यातील लांब असणा-या बीचपैकी हा एक आहे. कॅंडोलिम बीच गोव्यातील सर्वात प्रसिद्ध कंलगूट बीचपासून जवळ आहे. कॅंडोलिम बीचवरही पर्यटक शांततेने वेळ घालवू शकतात.
कंलगूट बीच-
कंलगूट बीच गोव्यातील सर्वात जास्त गर्दीचा बीच आहे. हा बीच वॉटर स्पोटर्स आणि डॉल्फिनसाठी प्रसिद्ध आहे. ख्रिसमस आणि नववर्षाला येथे हजारो पर्यटक दिसतात. कंलगूट सुमद्र किना-याला गोव्याची रानी समजले जाते. जगभरातील पर्यटक येथील समुद्र किना-यावर लोळण्यासाठी येथे आलेले दिसतात.
कॅवेलोसिस बीच-

कॅवेलोसिम बीच हा साल नदी किना-यावर आहे. नारळाची झाडे व शेती येथे पाहायला मिळते. त्यामुळे हा परिसर हिरवागार व प्रसन्न करणारा आहे. येथे पांढरी वाळू पाहायला मिळते.
पुढे पाहा, गोव्यातील समुद्रकिनारे म्हणजेच बीचेसची टिपलेली ही छानदार छायाचित्रे...