आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर 1 कोटीचे सोने जप्त, दुबईच्या महिलेस अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने एका महिलेकडून सुमारे एक कोटी रुपयांचे सहा किलाे सोने जप्त केले. याप्रकरणी फरीदा हजुरी या महिलेला अटक करण्यात आली आहे.
  
शनिवारी पहाटे दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर कस्टम विभागाच्या पथकाने विमानतळावर सापळा रचून फरिदा हिच्या सामानाची झडती घेतली असता तिच्याकडे सहा किलाे सोने आढळून आले. बाजारात या सोन्याची किंमत १ कोटी १६ लाख रुपये असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे. दरम्यान, फरिदा हिची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...