आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदीसाठी \'अच्छे दिन\'; तोळा आता 28 हजाराला, भाव आणखी घसरणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची मागणी कमी झाल्याने दर कमी होत असतानाच आता भारतीय रिजर्व बॅंकेने सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केल्याने भारतात मागील आठवड्याभरात प्रतितोळा सुमारे दोन हजार रूपयांची घट झाली आहे. आजच्या दिवशी गुरुवारी प्रतितोळा सुमारे 800 ते 1000 हजार रूपयांची घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आज सोने प्रतितोळा 27 हजार 900 रूपयांवर आले आहे. दरम्यान, सोन्याचे दर घसरल्यामुळे सोने खरेदी करणा-यांसाठी अच्छे दिन आले असावेच म्हणावे लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव प्रतिऔस 50 डॉलरपेक्षा कमी झाले आहेत.
आगामी तीन-चार महिन्यांच्या काळात सोन्याचे दर प्रति तोळा तीन ते चार हजार रूपयांनी कमी होतील, असा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने व्यक्त केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी घटल्याने सोन्याचे भाव खाली येत आहेत व आगामी काळात आणखी खाली येतील असे म्हटले आहे. 2014-15 या आर्थिक वर्षात सोन्याला मागणी राहणार नसल्याने पुढील वर्षी मार्चपर्यंत सोन्याचे दर खालीच राहणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
याबाबत सांगितले जात आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपीय देशांची आर्थिक स्थिती सुधारू लागली असल्याने डॉलरही वधारू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी तितका आकर्षक पर्याय राहणार नाही. त्यामुळे सोन्याचे भाव गडगडण्याची शक्यता आहे. रेटिंग्ज्च्या अंदाजानुसार स्थानिकस्तरावर सोने जागतिक बाजारातील किमतीनुसार स्वस्त होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर घसरून 1150 ते 1250 डॉलर प्रति औंसपर्यंत येईल. जो दर सध्या 1300 डॉलर प्रति औंस एवढा आहे.
अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये 2014-15 मध्ये आर्थिक वृद्धीच्या (जीडीपी) दरात वाढ होण्याचे अंदाज आहेत. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत होईल. तसेच अमेरिकेत पारंपरिक चलनविषयक धोरण हळूहळू बंद केल्याने व्याजदरातही फायदा होऊ शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यापासून तेथील लोक परावृत्त होतील. तसेच सोन्यावरील निर्बंध उठवले गेल्याने आयात वाढून सोन्याची उपलब्धताही वाढणार आहे. हे ही एक सोन्याचे दर कमी होण्यास प्रमुख कारण आहे, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.
भारत सरकारच्या आदेशानुसार रिजर्व बॅंकेने मंदीच्या पार्श्वभूमीवर व भांडवली बाजारात पैसा जास्त उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या वर्षी सोन्याच्या आयातीवर कर वाढवत काही कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर 30 हजारांवर पोहोचले होते. मात्र, आता अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सोन्यांची मागणी घटल्याने सोने आयातीवरील शुल्क कमी करून त्यावरील बंदी उठवली आहे. परिणामी सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीअभावी दरात होणारी घसरण व भारतात आयात शुल्कावरील बंदी उठवल्याने भारतात सोने प्रतितोळा आणखी खाली येऊ शकते असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोने आणखी दोन हजारांनी कमी गोऊ शकते म्हणजे ते प्रतितोळा 26 हजारांपर्यंत स्थिर होऊ शकते.