मुंबई- डिसेंबर अखरेपर्यंत सोन्याचा भाव ३५ हजार रुपये प्रती १० ग्रॅमवर जाण्याचा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. ब्रिटनमधील सार्वमतात लोकांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा कौल दिल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर अस्थिरतेचे सावट आहे.
शेअर बाजरांत घसरण होऊ शकते. परिणामी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढू शकते. शुक्रवारी ब्रेक्झिटच्या निकालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ८.२% टक्क्यांनी वधारून १,३१९ डॉलर प्रतिऔंसवर गेले. भारतातही ते १५०० रुपयांपर्यंत वाढले होते. अमेरिकेती राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि चीनमधील कर्जाची वाढलेली पातळीही आर्थिक अस्थिरतेत भर घालू शकते,असा अंदाज आहे.