आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने उतरले 29 हजारांवर, दिवसात 950 रुपयांनी स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि साठेबाजांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे सोन्याची झळाळी शुक्रवारी काळवंडली. तोळ्यामागे 1000 रुपयांची घसरण नोंदवत सोने 29,000 रुपये या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले. औरंगाबादेतही सोने तोळ्यामागे 950 रुपयांनी स्वस्त झाले.

चांदीचे भाव किलोमागे 1000 रुपयांनी घसरून 52,000 रुपयांवर स्थिरावले. गेल्या दोन-तीन दिवसांत सोन्या-चांदीच्या भावात मोठे चढ-उतार होत आहेत. एका दिवसात सोने 800 ते 900 रुपयांनी स्वस्त झाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा परिणाम असल्याचे राज्य सराफ फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्ता सावंत यांनी सांगितले.

सायप्रसचा परिणाम
सायप्रस हा युरोपातील देश मोठ्या प्रमाणात सोने विक्रीस काढणार असल्याच्या वृत्ताने मल्टी कमोडिटी बाजारात (एमसीएक्स) कच्च्े तेल घसरले. नंतर सोन्याचे भाव एक हजार रुपयांनी गडगडले.
विश्वनाथ बोदाडे, व्यवस्थापक, आनंद राठी ब्रोकर्स

इन्फोसिसमुळे सेन्सेक्स गडगडला
इन्फोसिस तिमाही निकालाने गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला. परिणामी जोरदार विक्रीमुळे इन्फोसिसचे समभाग 21.33 टक्क्यांनी घसरत 2295.45 वर बंद झाले. त्यामुळे सेन्सेक्स 299.64 अंकांनी घसरून 18,242.56 या दीड महिन्याच्या नीचांकी पातळीवर आला.