आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST : सोन्याच्या तस्करीत झाली वाढ; श्रीलंकेचे नागरिक सर्वात जास्त अॅक्टिव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीएसटीनंतर मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे. - Divya Marathi
जीएसटीनंतर मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे.
मुंबई- नोटबंदी नंतर थंड पडलेला सोने तस्करीचा व्यवसाय जीएसटी लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा तेजीत आला आहे. शरीरात छोटया प्रमाणात सोने लपवून त्याची तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. एअर इंटलिजन्स यूनिटने मागील आठवड्यात अशी 11 प्रकरणे पकडली आहेत. यातील सात प्रकरणात शरीरात सोने लपवून आणण्यात आले होते. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये 4 जण श्रीलंकेचे आहेत. 
 
कशी होते सोन्याची तस्करी
- एका अधिकाऱ्याने सांगितले की, सातत्याने होणाऱ्या तपासणीमुळे तस्कर सोन्याची मोठी तस्करी करण्याची जाखिम घेत नाहीत. सोने पकडल्यावर मोठे नुकसान होत असल्याने ते असे करत नाहीत. आता सोन्याची छोट्या-छोटया प्रमाणात तस्करी करण्याचा प्रयत्न होत आहे.
- मागील आठवडयात जॉर्ज अनोशान, मोहंमद शिरास, मोहंमद फरहान आणि अब्दुल रियार्ड या श्रीलंकेच्या नागरिकांना सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांनी शरीरात सोन्याची 26 बिस्किटे लपवली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...