आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्‍डमॅन स्‍वर्गीय रमेश वांजळेंची आजही आहे क्रेझ, अनेक राजकीय नेते आहेत यांचे चाहते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवल्यातील पंकज पारख यांनी सव्‍वा काटी रूपये खर्च करून चार किलो सोन्याचा शर्ट तयार केल्‍यामुळे पुन्‍हा एगदा ' गोलडमॅन'ची चर्चा जोर धरू लागली आहे. गळ्यात जाड- जाड सोन्‍याच्‍या अनेक साखळ्या, दोन्‍ही हाताच्‍या सर्वच बोटामध्‍ये सोन्‍याच्‍या आंगठ्या पाहिल्‍यानंतर गोल्‍डमॅन आमदार रमेश वाजळे यांचे स्‍मरण्‍ा स्‍मरण झाल्‍याशिवाय राहात नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वर्गीय आमदार रमेश वांजळे हे अशाच रीतीने दागिन्यांमुळे ‘गोल्डमॅन’ म्हणून यापूर्वी परिचित झाले होते. मनसेकडून आमदार झालेले वांजळे यांना मोठ्या प्रमाणात सोने वापरण्‍याचा छंद होता. वाजंळे हे जेव्‍हा पहिल्‍यावेळेस विधानसभेत गेले तेव्‍हा सर्वच आमदार त्‍यांच्‍याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहात होते.


त्यापाठोपाठ पुण्यातीलच दत्ता फुगे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोन्याच्या शर्टमुळे देशभरात प्रसिद्ध झाले. 3 किलो 200 ग्रॅम सोन्याचा शर्ट व 300 ग्रॅम सोन्याचा पट्टा असा साडेतीन किलो सोन्याचा पेहराव केला होतो. यामुळे फुगे यांनाही 'गोल्‍डमॅन' म्‍हणून ओळखले जाऊ लागले. मात्र फुगे यांचा विक्रम येवल्यातील पारख मोडणार आहेत. 3 किलो 900 ग्रॅम वजनाचा शर्ट, सोन्याचा पट्टा, सोन्याची फ्रेम असलेला चष्मा आणि चांदीचे बूट अशा प्रकारचा पोशाख वाढदिवसानिमित्त पारख करणार आहेत. पंकज पारख यांच्‍यामुळे पुन्‍हा एकदा ' गोल्‍डमॅन' ची चर्चा देशभर होत आहे.
रमेश वांजळे आणि इतर गोल्‍डमॅनविषयी जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...