आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gondia Congress Mla Gopal Agarwal Beaten Case, Assembly Adjourned

काँग्रेस आमदार मारहाणीवरुन विधानसभेत गोंधळ, सरकारविरोधात जयंत पाटलांचे उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोंदियातील काँग्रेस आमदार गोपाळ अग्रवाल यांना भाजपच्या कार्यकर्त्याने केलेल्या मारहाणीचे जोरदार पडसाद आज विधानसभेत उमटले. सत्तेत आल्याने भाजप व त्यांच्या कार्यकर्त्यांची मस्ती वाढली आहे असे सांगत विरोधी आमदारांनी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला. दरम्यान, या प्रकरणावरून फडणवीस सरकार बॅकफूटवर आले आहे. आम्ही मारहाणीचे समर्थन करीत नाही. संबंधित पदाधिका-याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर नियमानुसार कारवाई होईल असे स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिले. बापट यांच्या स्पष्टीकरणानंतर विरोधी आमदारांनी गदारोळ सुरुच ठेवला. अखेर या प्रकाराबाबत तासाभरात सभागृहात निवेदन सादर करेल.
गोंदिया नगरपालिकेतील वादातून गोंदियातील काँग्रेसचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल यांना भाजपचे नगरसेवक शिव शर्मा व त्यांच्या साथीदारांनी शनिवारी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.
अग्रवाल यांनी हॉटेल ग्रँड सीता येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी शिव शर्मा हे त्यांचा साथीदार श्रीवाससोबत तिथे आले. त्यांनी थेट आमदार अग्रवाल यांच्या नाकावर, तोंडावर, डोळ्यावर तसेच गालावर ठोसे लगावले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. अग्रवाल यांचा मुलगा विशाल त्यांना वाचवण्यासाठी आला असता त्यालाही शर्मा त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती. दोघांचे कपडेही फाडण्यात आले होते. मारहाण करून दोघेही तेथून निघून गेले होते.
शिव शर्मा भाजपमधून निलंबित
आमदार गोपाळ अग्रवाल यांच्यावर हल्ला करणारे भाजपचे नगरसेवक शिव शर्मा यांच्यावर भाजपने निलंबनाची कारवाई केली आहे. शनिवारी सायंकाळी गोंदियामधील हॉटेल ग्रँड सीता येथे आमदार अग्रवाल यांची पत्रकार परिषद सुरू होती. त्याच वेळी शिव शर्मा त्यांच्या सहकाऱ्याने अग्रवाल यांच्यावर हल्ला केला होता.
या घटनेमुळे गोंदिया शहरात खळबळ माजून कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठा बंद पाडल्या. भाजपनेदेखील या घटनेची गंभीर दखल घेत शर्मा यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली. शर्मा यांचे कृत्य अशोभनीय असून, त्याचे कुठल्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे वाचा, सरकारविरोधात जयंत पाटील यांचे विधानभवनात उपोषण...