आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good News: From Sunday Country's First Monoraily Run In Mumbai

चांगली बातमी: मुंबईत देशातील पहिली मोनो रेल धावणार रविवारपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या ऐश्वर्यात भर घालणार्‍या, देशातील पहिल्या मोनो रेलचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत असून रविवारपासून ही ‘लाल परी’ लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. वडाळा ते चेंबूर या दरम्यान ही गाडी दिवसभर धावणार आहे. दुसर्‍या टप्प्यात गाडगे महाराज चौक ते दक्षिण मुंबईदरम्यान मोनो धावेल. एमएमआरडीए, एलअँन्डटी व मलेशियाच्या स्कॉमी इंजिनिअरिंगंच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला.


* 8.9किमी अंतर वडाळा ते चेंबूर
*20 मिनिटांत कापणार अंतर
* 15 मिनिटांना येणार गाडी
*06गाड्या दिवसभर धावणार
*3000हजार कोटी प्रकल्पाचा खर्च
*10गाड्या दुसर्‍या टप्प्यात धावणार
*04 कोच प्रत्येकी पहिल्या टप्प्यात सेवेत<ऊठअें31्र7>560 प्रवाशांची एकावेळी सोय 05-19 रुपये तिकीट दर