आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाळे रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे घसरले, मुंबई-गुजरात मार्गावरील वाहतूक ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबई आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. मंगळवारी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, दुर्घटनाग्रस्त मालगाडी गुजरातकडून मुंबईकडे येत होती. दोन्ही बाजुकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुर्घटनाग्रस्त मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून बाजुला करण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच मार्ग मोकळा करण्‍यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...