आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google And Tata Is Starting Common Programme For Women\'s Of Villages

ग्रामीण महिलांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंटरनेटच्या महाजालाने अनेकांना सहजपणे सामावून घेतले असले तरी ग्रामीण भागातील महिला अाजही त्यापासून वंचत असून इंटरनेट वापरण्याचे प्रमाण केवळ १२ टक्के अाहे. या महिलांना इंटरनेट साक्षर करून नव्या डिजिटल युगात प्रवेश करण्यासाठी गुगल इंडिया अाणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनेट साथी’ नावाचा एक अनाेखा उपक्रम राबवण्यात येत अाहे. प्रारंभी हा उपक्रम तीन शहरांमधून सुरू हाेणार असला तरी लवकरच त्याचा देशभरात प्रसार करण्यात येणार आहे.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते मुंबईत या उपक्रमाचे अनावरण करण्यात अाले. गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन अानंद या वेळी उपस्थित हाेते. गुगल इंडियाचा भागीदार असलेल्या इंटेलच्या ‘हेल्पिंग वुमन गेट अाॅनलाइन’ या उपक्रमाची साथदेखील मिळाली अाहे.

डिजिटल राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया कार्यक्रमावर दिलेला भर खराेखरच काैतुकास्पद असून डिजिटल माध्यमातून भारत जाेडला गेल्यानंतर अापाेअापच उर्वरित जगताशी जाेडला गेल्यामुळे देशातील नागरिक अाणखी समर्थ हाेऊ शकतील, अशा शब्दांत उद्याेगपती रतन टाटा यांनी पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचे काैतुक करून इंटरनेट भारताला शिक्षित करण्यास मदत तर करेलच; पण महिलांना चांगले जीवन जगण्यासाठी बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला.
ग्रामीण महिलांना इंटरनेट प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी अाधी त्यांना एकत्र अाणणे गरजेचे अाहे. या उपक्रमामुळे देशातील महिलांना डिजिटल साक्षर करण्याचे अाव्हान अाम्ही पूर्ण करू, असे राजन अानंद यांनी या वेळी सांगितले.

सायकल बनणार शिक्षणाचा दुवा
इंटरनेटचे मूलभूत शिक्षण देण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची सायकल तयार करण्यात अाली अाहे. अाइस्क्रीमपासून ते अन्य मालाची वाहतूक करण्यासाठी पूर्वी सायकलींचा वापर केला जायचा. खेड्यांचा बाहेरच्या जगाशी सुसंवाद करून देणारा हा एक महत्त्वाचा दुवा हाेता. अाता हाच दुवा महिलांना इंटरनेट साक्षर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार अाहे. इंटरनेट साथी उपक्रमासाठी अशा प्रकारे खास एक हजार सायकली तयार करण्यात अाल्या अाहेत.

अशी हाेईल इंटरनेट साथी उपक्रमाची अंमलबजावणी
- या उपक्रमाचा प्रारंभ गुजरात, राजस्थान आणि झारखंड येथून. त्यानंतर देशभरात विस्तार
- पुढील १८ महिन्यांमध्ये साडेचार हजारपेक्षा जास्त खेडी, पाच लाख महिलांपर्यंत पाेहोचण्याचे लक्ष्य
- चार ते सहा महिने दर आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस इंटरनेट कार्ट/गाडी खेड्यात उपलब्ध
- महिलांना स्वतःहून साधन वापरण्याचा आत्मविश्वास येईपर्यंत भरपूर प्रशिक्षण
- कार्ट/गाडीने तीन खेड्यांच्या समूहाचे प्रशिक्षण पूर्ण केले की तसाच कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ती लगतच्या दुसऱ्या खेड्याच्या समूहाकडे जाईल.
- बचत गट, स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांना प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करणार.