आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google At Top Of The List Of Favourite Company Giving The Job

नाेकरी देणा-या कंपन्यांमध्ये ‘गुगल’ला सर्वाधिक ‘लाइक्स’, सोनी दुसरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाेकरी देणा-या सर्वात पसंतीच्या कंपन्यांमध्ये गुगलने सर्वात वरचे स्थान पटकावले असून त्यापाठाेपाठ साेनी कंपनीला पसंती देण्यात अाली असल्याचे मनुष्यबळ स्राेत क्षेत्रातील ‘रँडस्टड’ या अाघाडीच्या सल्लागार कंपनीने केलेल्या एका पाहणीत दिसून अाले अाहे.
गेल्या चार वर्षांपासून सलग अव्वल स्थानावर असलेलेली मायक्राेसाॅफ्ट इंडिया ही कंपनी यंदा ‘हाॅल अाॅफ फेम’मध्ये समाविष्ट करण्यात अाली अाहे. क्षेत्रनहाय विशेष कंपनी म्हणून यंदा टाटा स्टील, पी अँड जी, हाेंडा इंडिया या कंपन्यांना पुरस्कार देण्यात अाले अाहेत.
नाेकरीच्या शाेधासाठी साेशल नेटवर्किंगवर भर
नाेकरी शाेधण्याचा कल बदलत असून अाता साेशल नेटवर्किंग साइट्स हा नवा ट्रेंड सुरू झाला अाहे. हे प्रमाण जवळपास ६६ टक्के अाहे.
नाेकरी देणा-या या कंपन्यांना पसंती
हॅवलेट पॅकर्ड, एचपीसीएल, अायबीएम , इन्फाेसिस, एल अँड टी, अाेएनजीसी, सॅमसंग, स्टेट बँक अाॅफ इंडिया, ताज ग्रुप अाॅफ हाॅटेल्स, टीसीएस, टाटा माेटर्स, टाेयाेटा, विप्राे.

भारतीय अर्थव्यवस्थेबराेबरच नाेकरीच्या बाजारालादेखील चालना मिळत अाहे; परंतु चांगल्या टॅलेंटला अाकर्षित कसे करावे अाणि ते टिकवून कसे ठेवावे, याचा ताण कंपन्यांना सहन करावा लागत असल्याचे कंपनीचे सीईओ मूर्थी उप्पालुरी यांनी सांगितले.

नाेकरीसाठी पाच महत्त्वाचे घटक
वेतन अाणि कर्मचारी लाभ ५४ %
दीर्घकालीन नाेकरीची सुरक्षा ४९ %
कामकाजातील समताेल ३९ %
कामासाठी अनुकूल वातावरण ३९ %
कंपनीची सुदृढ अार्थिक प्रकृती ३८ %