आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्‍टर रखमाबाई यांना डुडलद्वारे गुगलची श्रध्‍दांजली, आज 153वी जयंती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतातल्‍या पहिल्‍या प्रॅक्‍टीसिंग डॉक्‍टर म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मराठमोळ्या रखमाबाई यांच्‍या कार्याचा गुगलने आपल्‍या शैलीत गौरव केला आहे. रखमाबाई यांच्‍या 153व्‍या जयंतीनिमित्‍त गुगलने त्‍यांना डुडल स‍मर्पित केला. 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत त्‍यांचा जन्‍म झाला होता.

 

ज्‍याकाळी महिला अनेक धार्मिक आणि सामाजिक बंधनात जखडलेल्‍या होत्‍या त्‍या काळी रखमाबाई यांनी डॉक्‍टर बनण्‍याचे धाडसी स्‍वप्‍न पाहिले. तेव्‍हा प्रतिगाम्‍यांच्‍या विरोधाला न जुमानता 1894मध्‍ये विदेशात जाऊन त्‍यांनी वैदकीय शिक्षण घेतले होते.

 
रखमाबाई या स्‍वत: बालविवाहाच्‍या बळी ठरल्‍या होत्‍या.  वयाच्‍या केवळ 11व्‍या वर्षी 19 वर्षांच्‍या दादाजी भिकाजी यांच्‍याशी त्‍यांचा विवाह झाला होता. लग्‍नानंतर त्‍या सासरी गेल्‍या नाहीत. आपली विधवा आई जयंतीबाई यांच्‍यासोबतच त्‍या राहिल्‍या. काही वर्षांनी रख्‍माबाईंच्‍या आईने सखाराम अर्जुन यांच्‍याशी दुसरा विवाह केला. सखाराम अर्जुन हे प्रागतिक विचारसरणीचे होते. सामाजिक सुधारणेच्‍या चळवळीचे ते पुरस्‍कर्ते होते. ते स्‍वत: डॉक्‍टर आणि मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्‍ये बॉटनीचे प्राध्‍यापक होते. रखमाबाईंना शिक्षणासाठी त्‍यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला होता. 

 

तुरुंगात जाईल, पण सासरी जाणार नाही; सनातनी काळात रखमाबाईंनी दाखवला बाणेदारपणा

रखमाबाई माहेरी राहून आपले शिक्षण पूर्ण करत होत्‍या. सासरी जाण्‍यास नकार दिला होता. त्‍यामुळे बायकोला सासरी पाठवावे असा दावा त्‍यांचे पती दादाजी भिकाजी यांनी कोर्टात केला. या खटल्‍यात दादाजी यांना विजय मिळाला होता. एक तर सासरी जा किंवा शिक्षा भोगा, असा आदेश कोर्टाने रखमाबाई यांना दिला होता. मात्र आपण शिक्षा भोगू पण सासरी जाणार नाही, असा बाणा रखमाबाईंनी दाखवला होता. यावेळी रखमाबाई व त्‍यांच्‍या कुटुंबीयांना सनातन्‍यांकडून फार त्रास सहन करावा लागल्‍या. वर्तमानपत्रातूनही त्‍यांची टिंगळटवाळी करण्‍यात आली. तेव्‍हा रखमाबाईंनी 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्‍ये द हिंदू लेडी या नावाने लेख लिहित आपली बाजू मांडली. या पत्रांमुळे तेव्‍हा खळबळ माजली होती. हा खटला त्‍याकाळी चांगलाच गाजलाच होता. अखेर 1891मध्‍ये 'समंती वयाचा कायदा' अस्तित्‍वात आला. दादाजी यांनीही आपली केस मागे घेतली होती. यानंतर 35 वर्षे रखमाबाई यांनी भारतात वैदकीय सेवा दिली. वयाच्‍या 91व्‍या वर्षी त्‍यांचे निधन झाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, रखमाबाई यांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...