आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopichand Hinduja Lifts Ban From India After Nuclear Test

अणुचाचणीनंतर भारतावर होते निर्बंध, हे मुंबईकर उद्योगपती बनले संकटमोचक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Titleगोपीचंद (जीपी) हिंदुजा... - Divya Marathi
Titleगोपीचंद (जीपी) हिंदुजा...
मुंबई- लंडनमधील अब्जाधिश उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे वॉर ऑफिस नुकतेच खरेदी केल्याचे चर्चेत आले आहेत. या बिझनेसमॅन टॉयकॉनला बहुतांश लोक जीपी या नावानेच ओळखतात. 1998 मध्ये वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती, त्यावेळी संपूर्ण जगाने भारतावर निर्बंध लादले होते. त्यानंतर वाजपेयी सरकारने हिंदुजा बंधूंच्या माध्यमातूनच ब्रिटिश सरकारसमोर आपली बाजू मांडली होती.
भारतावरील निर्बंध उठविण्यासाठी संकटमोचक बनले जीपी-
- पंतप्रधान अटलजींचे प्रधान सचिव आणि संकटमोचक मानले जाणारे ब्रजेश मिश्रा जून 1998 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना भेटण्यासाठी 10, डाउनिंग स्ट्रीटला गेले होते.
- ही भेटही जी. पी. हिंदुजा यांनीच घडवली होती. एवढेच नाही, तर ते स्वत: मोठे बंधू श्रीचंद यांच्यासह उपस्थित होते.
- ब्लेअर जीपींना पत्र लिहीत असत, तेव्हा संबोधन 'जीपी' असे असायचे आणि शेवटी लिहिलेले असायचे- युवर्स एव्हर टोनी.
- ब्लेअर दांपत्य हिंदुजा कुटुंबाच्या दिवाळी आयोजनातही सहभागी असे. सांगण्याचे तात्पर्य असे की, ब्रिटनचे कोणतेही सरकार आणि नोकरशाहीशी अगदी जवळचे संबंध या कुटुंबाचे राहिले आहेत. हे कुटुंब अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्येच राहत आहे.
- लक्ष्मीनिवास मित्तल यांच्यानंतर हे कुटुंबीय प्रभावी आहे.
पाकिस्तानातून आले मुंबईत-
गोपीचंद यांचा भावांमध्ये दुसरा क्रमांक. त्यांचे वडील परमानंद 1914 मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील शिकारपूर येथून मुंबईला आले. ते गालिचे, सुका मेवा आणि केशरची आयात इराणमधून करत असत. पाश्चिमात्य देशांत भारताचे कपडे, चहा, मसाल्यांची निर्यात करत असत. त्यांनीच हिंदुजा ग्रुपचा पाया रचला.
इराण सोडून लंडनचा रस्ता-
1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांतीचे वारे वाहू लागल्यानंतर हा ग्रुप इराणमधील व्यवसाय गुंडाळून लंडनला गेला. त्यांच्या वडिलांनी बॉलीवूडचे चित्रपट परदेशात विकण्याचा व्यवसाय केला होता. गोपीचंद यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून वडिलांसोबत काम सुरू केले. 1984 मध्ये गल्फ ऑइल आणि 1987 मध्ये अशोक लेलँड घेऊन त्यांनीच भारतात पहिली एनआरआय गुंतवणूक केली होती.
सर्व भावांचे एकच स्वयंपाकघर-
बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतरही चारही भावांनी मौन राखले. गोपीचंद हे त्यांचे मोठे भाऊ श्रीचंद यांच्यासह लंडनच्या मेफेअरमध्ये राहतात. तिसरे भाऊ प्रकाश जिनेव्हात तर चौथे भाऊ अशोक (अशोक लेलँडचे प्रमुख) मुंबईत राहतात. प्रत्येक देशात या कुटुंबाचे घर आहे. सगळे एकत्र राहतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंदू वैदिक पद्धतीने राहणे शिकवले होते. संपूर्ण कुटुंब शाकाहारी असून, मद्य आणि इतर व्यसनांपासून दूर आहे. जगभरात उद्योग आणि घरे आहेत. सर्वांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व भावांचे स्वयंपाकघर एकच आहे आणि सर्व जण एकत्रित जेवतात. तेही पूर्णपणे शाकाहारी.
काय खास आहे जीपींबाबत-
वय- 75 वर्षे
वडील- परमानंद, आई, तीन भाऊ
शिक्षण- मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून पदवीधर, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टरतर्फे डॉक्टरेट ऑफ लॉची मानद पदवी, लंडनच्या रिचमंड कॉलेजमधून डॉक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स.
कुटुंबीय- पत्नी, दोन मुले धीरज आणि संजय.
इंग्लंडच्या 10, डाउनिंग स्ट्रीटशी सदैव गहिरे संबंध
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गोपीचंद हिंदुजा (जीपी) यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे निवडक फोटोज...