आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अमित शहांच्या उपस्थितीत परळीत \'गोपीनाथगड\'चे थाटात लोकार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गड या भव्य स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते आज दुपारी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते, मंत्री, मित्रपक्षाचे नेते उपस्थित आहेत. बीडमधील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर आज दुपारी अनावरण करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित संघर्षयात्रा सिनेमा आज महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे.
काय व कसा आहे गोपीनाथ गड?
- परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या भव्य मैदानावर गोपीनाथ मुंडेंवर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी समाधीस्थळ उभारण्यात आले आहे. याच मैदानाच्या 12 एकर जागेत गोपीनाथ गड उभारला गेला आहे.
- या स्मारकात गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनातील 18 ते 20 महत्त्वाचे प्रसंग विविध माध्यमातून साकारण्यात आले आहे.
- या गडात एक मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले असून तेथे 30 फुटी पुतळा उभारण्यात आला आहे.
- या गडात 12 ज्योतिलिंर्गाचे दर्शन घडवणारी एक विशेष डार्क राइडही असणार आहे.
- या स्मारकात मुंडे यांच्या जीवनपटासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरूणांसाठी एक अद्ययावत प्रशिक्षण केंद्र आहे.
- गेल्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 12 डिसेंबर 2014 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ झाला होता.
- पुण्यातील गार्डियन कॉर्पोरेशनच्या 'गार्डियन मिडिया अॅंड एन्टरटेन्मेंट' या कंपनीने हे स्मारक उभारले आहे.
पुढे पाहा, गोपीनाथ गडाची उभारणी सुरु असतानाची क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...