आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde Complaint Againest Mca Over His Nomination Rejection

पवारांना व मला वेगवेगळा न्याय का?- गोपीनाथ मुंडे, ...तर कोर्टात जाणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची निवडणूक तीन-चार दिवसावर येऊन ठेवली आहे. मात्र, एमसीएच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज एमसीएने अवैध ठरविल्याने मुंडे यांची घोर निराशा झाली आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंनी आपला अर्ज अवैध का ठरवला असे एमसीए अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. तसेच एमसीएच्या अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तर न आल्यास आपण कोर्टात धाव घेऊ, असे सांगत मुंडेंनी मला व शरद पवारांना वेगळावेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागील आठवड्यात दाखल केला होता. त्यानंतर शरद पवार यांनीही एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या दोन बड्या नेत्यांत अध्यक्षपदासाठी टक्कर होणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, एमसीएने आपल्या घटनेच्या नियम क्रमांक 17 चा आधार घेत गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज शनिवारी अवैध ठरविला. त्यामुळे पवार एमसीएवर बिनविरोध निवडून जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, अर्ज अवैध झाल्यानंतर 'पवारांनी मला घाबरून माझा अर्ज बाद ठरविला' अशी राजकीय प्रतिक्रिया दिली होती. दोन दिवसानंतर मात्र मुंडे आता एमसीएच्या नियम क्रमांक 17 वर प्रश्न उपस्थित करून असून, शरद पवार, विलासराव देशमुख यांना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करीत आहेत.