आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या नावे मते मागत मनसे फिरत आहे- गोपीनाथ मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेचे कार्यकर्ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागत फिरत आहेत अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. पुण्यासह यवतमाळ-वाशिममध्ये असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंडे यांनी म्हटले आहे की, मनसेकडे लोकसभेला मते मागण्यासाठी लोकांसमोर जाण्यासाठी ठोस असा काहीही मुद्दा नाही. त्यांच्या नेत्याचा करिश्मा संपलेला दिसत आहे. त्यामुळेच ते मोदींच्या नावाचा वापर करून मतांचा जोगवा मागत आहेत.
दरम्यान, मनसेची पहिली सभा येत्या 31 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या मुर्हूतावर पुण्यात सभा होत आहे. पुण्याचे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासाठी राज ठाकरे पहिली सभा घेतील व प्रचाराचा नारळ फोडतील. त्यावेळी मुंडे यांच्यासह शिवसेनेने राज व मनसेवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देतील असे बोलले जात आहे. तसेच आपण आतापर्यंत पक्षाची खूप अडचणीतून वाट काढत पुढे आलो आहे. आता एकाएकाची वाट लावतो असे सांगत आगामी काळात फक्त शिवसेनेलाच लक्ष्य करणार असल्याचे संकेत राज यांनी दिले आहेत.