आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस मतदानावरून गोपीनाथ मुंडेंविरोधात तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या लोकसभा निवडणुकीत काका गोपीनाथ मुंडे यांना निवडून आणण्यासाठी आपल्यावर बोगस मतदानाची जबाबदारी होती, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते नारायण नांबियार यांनी स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

22 मार्च रोजी झालेल्या एका सभेत धनंजय म्हणाले होते की, 2009 च्या लोकसभेत काकांना निवडून आणण्यासाठी आपल्यावर बोगस मतदानाची जबाबदारी होती. त्यांच्या वक्तव्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी याबाबत धनंजय मुंडे यांनाच विचारा, असा सल्ला प्रसारमाध्यमांना दिला होता. त्यामुळे धनंजय यांची चांगलीच गोची झाली होती. याप्रकरणी पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.