आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, BJP, Nationalist Congress, Lok Sabha

राष्‍ट्रवादीचे कंबरडे मोडून काढणार,गोपीनाथ मुंडेंची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आजपर्यंत राष्‍ट्रवादीच्या अनेक वजनदार नेत्यांना भाजपत आणले. आपण यावरच थांबणार नसून येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही राष्‍ट्रवादीचे नेते फोडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कंबरडेच मोडून काढू’, अशी घोषणा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी केली. मुंडेचे एकेकाळचे कट्टर समर्थक व सध्याचे राष्‍ट्रवादीचे सरचिटणीस फुलचंद कराड यांनी शुक्रवारी अनेक कार्यकर्त्यांसह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.


भगवान सेनेचे सरसेनापती असलेले कराड यांनी 2002 मध्ये मुंडेंशी झालेल्या मतभेदामुळे भाजपचे जिल्हाध्यक्षपद सोडून राष्‍ट्रवादीत प्रवेश केला होता. 2009 मध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडेंना विधानसभा निवडणुकीत आव्हानही दिले होते, मात्र कराड यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी परळी मतदारसंघातून राष्‍ट्रवादीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळवून दिले होते. तरीही गेल्या 12 वर्षांत राष्‍ट्रवादीनेही आपल्याला डावलल्यामुळे आपण पुन्हा भाजपत मुंडेंच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे कराड यांनी सांगितले. कराड यांच्या पक्षप्रवेशामुळे आता मुंडेंचे पारडे जड झाले आहे.


पवारांनी पुतण्याचा सल्ला ऐकावा : गोपीनाथ मुंडे म्हणाले, शरद पवार यांनी केवळ महाराष्‍ट्रातील ताकदीवर पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू नये. याबाबतीत त्यांनी अजित पवारांचा सल्ला ऐकायला हवा. राष्‍ट्रवादीचे 4 पेक्षा जास्त खासदार निवडून येणारच नाहीत, मात्र महायुतीचे 33 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, हे निश्चित.


धनंजय मुंडे हे तर मोबाईल नेते : कराड
राष्‍ट्रवादी काँग्रेससाठी आपण 10 वर्षे काम केले. मुंडेंना टक्कर देत 65 हजार मते मिळवली. पण, पवारांभोवती चांडाळचौकडी असून ती आम्हाला त्यांच्या जवळ जाऊ देत नाहीत. राष्‍ट्रवादीने माझा गोपीनाथ मुंडेंविरोधात केवळ उपयोग करून घेतला.धनंजय मुंडेंना आपण नेते मानतच नाही. धनंजय हे लोकनेते नसून मोबाईल नेते आहेत. त्यांचा काहीएक उपयोग राष्‍ट्रवादीला होणार नाही.