आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर राज्यमंत्री सुरेश धस यांच्या रूपाने उमेदवार सापडला. गोपीनाथ मुंडेंविरुद्ध कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणूक लढवावी म्हणून राष्ट्रवादीकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, जयदत्त अण्णांच्या नाकदुर्या काढून थकल्यानंतर अखेर धस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.
राष्ट्रवादीने गेल्या आठवड्यात पहिली यादी जाहीर केली. मात्र, बीडसह हातकणंगले, हिंगोली व मावळचा निर्णय राखीव होता. मुंडेंविरुद्ध जयदत्त यांनी लढावे, असे शरद पवार यांना वाटत होते. यासाठी प्रयत्न सुरू होते.
जयदत्त यांनी उमेदवारीबाबत होकार किंवा नकार कळवताना चालढकल चालवली होती. शरद पवार यांना मात्र ते तयार होतील, अशी आशा होती. अखेर त्यांनीही नाद सोडून धस यांना पुढे केले.
उभे राहण्यास सांगितल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी झाली. मुंडेविरूद्धची निवडणूक राष्ट्रवादीने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. मुंडेंना बीडमध्येच अडकवून भाजपच्या ताकदीचे खच्चीकरण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. मात्र दुसर्या पसंतीचा उमेदवार देऊन पहिल्या फेरीत तरी राष्ट्रवादीने कच खाल्याचे दिसत आहे.
जंगी मुकाबला : शरद पवार तसेच अजित पवार यांच्याविरुद्ध तोफ डागण्याची एकही संधी मुंडेंनी सोडलेली नाही. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीने मुंडेंच्या बीडला सुरूंग लावताना मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडेंना फोडून गोपीनाथरावांना मोठा धक्का दिला होता. मात्र यामुळे निराश न होता मुडेंनी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या गडांना सुरूंग लावण्याची जिद्द बाळगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीत आणत राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले. परिणामी लोकसभाच नव्हे तर विधानसभेत मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी असा जंगी मुकाबला पाहायला मिळेल.
धसना बळीचा बकरा बनवले : मुंडे
सुरेश धस यांना राष्ट्रवादीने बळीचा बकरा बनवले आहे. आपल्याविरुद्ध उभे राहण्यास कोणीच तयार होत नसल्यामुळे पवारांनी शेवटच्या क्षणी धसांना गळ घातली, असा टोला गोपीनाथ मुंडेंनी लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.