आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde\'s Accident Death, State Bjp Demands To HM Abt Cbi Enquiry

मुंडेंच्या मृत्यूची CBI चौकशी; विधानसभेला फटका बसू नये यासाठी भाजपचीच \'खेळी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. तशी मागणी प्रदेश भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे करण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत राज्यातील लोकांच्या भावना तीव्र आहेत याची माहिती दिली होती. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता व विधानसभेला लोकांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करावी अशी फडणवीस-गडकरी यांनी संयुक्तिकपणे राजनाथसिंह यांच्याकडे केली होती. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजनाथ सिंह यांना राजकीय स्थितीची माहिती देण्यात आली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी मुंडेंच्या अपघाती मृत्यूची सीबीआय घोषणा केली जाईल असे गडकरी-फडणवीस यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.
आगामी चार महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंडेंच्या निधनाचा फटका व समर्थकांत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. बहुजन नेते भाजपपासून दुरावले तर बहुजन समाज आपोआप तुटेल ही भीती फडणवीस यांना वाटत आहे. त्यामुळेच गडकरींशी चर्चा करून राज्यात महायुतीला सत्तेवर आणायचे असेल तर बहुजन समाजाने केलेली मुंडेंच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी लावली पाहिजे अशी भूमिका मांडल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.यासाठीच आगामी विधानसभेला भाजपला फटका बसू नये हाच एकमेव फॉर्स असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाचा पुढे, सीबीआय चौकशीमागे भाजपची काय-काय गणिते आहेत...