आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुंबईत आज सर्वपक्षीय शोकसभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना आज मुंबईत सर्वपक्षीय आदरांजली वाहण्यात येणार आहे. जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, ओबेरॉय हॉटेलजवळ, नेताजी सुभाष मार्ग, नरीमन पॉइंट येथे सायंकाळी 5 वाजता ही शोकसभा होईल.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष ऍड. आशीष शेलार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शोकसभेचे आयोजन मुंबई भाजपने केले आहे.