आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde's Application For Mumbai Cricket Association President's Post Rejected

एमसीए निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज अवैध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 18 ऑक्टोबर रोजी होणार्‍या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज शनिवारी रात्री अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीसाठी मुंबई शहर, उपनगर किंवा ठाणे येथील रहिवासी असणे गरजेचे आहे. मात्र, मुंडे यांनी बीडचे रहिवासी प्रमाणपत्र जोडल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. दरम्यान, आपण मुंबईचे रहिवासी असल्याचे मुंडे म्हणाले असून अर्जावरही मुंबईचाच पत्ता दिला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ते म्हणाले.