आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Mundes Big Brother Pandit Anna Entry To Rashtrawadi

पंडित अण्णा मुंडे यांचा गुरुवारी राष्ट्रवादी प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: परळीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आमदार धनंजय यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्भवलेला गृहकलह पक्षांतराच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. गोपीनाथरावांचे थोरले बंधू आणि धनंजय यांचे वडील पंडित अण्णा मुंडे येत्या गुरुवारी, 19 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. परळीमध्येच हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.
चुलत्या-पुतण्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर पंडितअण्णाही वादात उतरले होते. गोपीनाथ यांनी आपल्याला कोणतीही मदत केली नव्हती. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनीच धनंजयला आमदार केले, अशी वक्तव्ये पंडितअण्णा यांनी केली होती. गोपीनाथराव आणि पंडितअण्णा यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगले होते. धनंजय यांच्या बंडाला राष्ट्रवादीची फूस असल्याची चर्चा होतीच. पंडितअण्णा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने त्याला पुष्टीच मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडेंबाबतही चर्चा होणार होती. परंतु काही कारणास्तव ती झाली नाही. तथापि, पंडित अण्णांशी चर्चा झाली असून, त्यांना पक्षात प्रवेश देण्याचे मान्य करण्यात आले आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडेंनी धनंजयला बदनाम करण्याचा कट रचलाय