आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खाच्या सावटाखाली मुंडेंचा दशक्रिया विधी; पंकजाने पुन्हा दाखविला धीरोदत्तपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी आज सकाळी 10 वाजता पैठण ( जि. औरंगाबाद) येथील गोदावरी नदीकाठच्या कृष्णकमल तीर्थावर पार पडला. या विधीसाठी राज्यभरातून सुमारे दीड- दोन लाख कार्यकर्ते आले होते. यावेळीही मुंडे-महाजन कुटुंबियांसह कार्यकर्त्यांत दुखाची भावना दिसून येत होती. मात्र, या क्षणीही मुंडेंची थोरली कन्या पंकजाने धीरोदत्तपणा दाखवत विधिवत दशक्रिया कार्यक्रम पार पाडला.
सकाळी 8.30 वाजता स्व. मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई मुंडे, आमदार पंकजा पालवे, प्रीतम खाडे, यशश्री मुंडे तसेच महाजन परिवारातील प्रकाश महाजन, खासदार पूनम महाजन, मुंडेंची बहीण सरस्वती कराड यांचे आगमन झाले. सकाळी 10 सुमारास दशक्रिया विधीस अनंतशास्त्री खरे गुरुजी व त्यांच्या सहका-यांनी विधिवत सुरुवात केली. अनंतशास्त्री खरे गुरुजी व त्यांच्या सगका-यांनी ब्रावृंद विधी केला. हा विधी सुमारे तीन तास चालला. याप्रसंगी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, आमदार भाऊसाहेब फुंडकर, माधव भंडारी यांच्यासह भाजपच्या अनेक आमदारांसह मराठवाड्यातील व राज्यभरातून दीड- दोन लाख कार्यकर्ते आले होते.
पैठण शहरातील नगरपालिकेच्या वाहनतळावर व्हीआयपींच्या वाहनांची सोय करण्यात आली होती. अन्य वाहनांसाठी जांभूळ बन, उद्यान रोडवरील मैदान, स्टेडियम या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. दशक्रिया विधीसाठी जवळपास दोन लाख कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पोलिस प्रशासनातर्फे संपूर्ण पैठण शहरभर जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये 5 पोलिस अधीक्षक, 12 पोलिस उपअधीक्षक, 25 पोलिस निरीक्षक, 4 राज्य राखीव बलाच्या तुकड्या व 1700 पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश होता.
पुढे पाहा, आपल्या पित्याची दशक्रिया विधी करताना कन्या पंकजासह तिच्या बहिणी...