आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde\'s Rs 8 Crore Lok Sabha Poll Expenditure Remark

8 कोटींच्या \'त्या\' वक्तव्यावरून गोपीनाथ मुंडेंना निवडणूक आयोगाचा दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याची सनसनाटी कबुली देऊन अडचणीत सापडलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाने अखेर दिलासा दिला आहे. अशी वक्तव्ये भविष्यात होणार नाहीत याची काळजी घ्या एवढीच समज आयोगाने मुंडे यांना दिली आहे.
मुंडे यांनी निवडणूक खर्चाबाबत केलेल्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने स्वत:हून घेतली होती. तसेच मुंडे यांच्या भाषणाचा मजकूर व व्हिडिओ फुटेज आयोगाने मागविले होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादीने मुंडे यांच्या वक्तव्याची चौकशी करून आयोगाने घालून दिलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडल्याबद्दल त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी केली होती.
दरम्यान 2009 च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या खर्चाची जाहीर कबुली दिल्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करून दाखवावीच, असे आव्हानही मुंडे यांनी दिले होते. तसेच माझ्यावर कारवाई करण्याचा कोणताही अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असे सांगितले होते. त्यामुळे निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले होते. मात्र मुंडेंना आयोगाने केवळ समज देऊन दिलासा दिला असल्याचे बोलले जात आहे.
पुढे विस्ताराने वाचा, मुंडे काय म्हणाले होते निवडणूक खर्चाबाबत....