आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत फिल्मसिटीजवळील जंगलाला लागलेली आग अखेर आटोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोरेगाव फिल्मसिटीजवळील जंगलाला सोमवारी लागलेल्या आग तब्बल 22 तासांच्या अथक परिश्रमानंतर आटोक्यात आली आहे. या आगीने मंगळवारी सकाळी रौद्र रुप धारण केले होते. आग बोरीवलीपपर्यंत पसरली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळपास 15 कि.मी. परिसराला या आगीचा वेढा दिला होता. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांनी रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव फिल्मसिटीजवळ असलेल्या जंगलात सोमवारी‍ ही आग लागली होती. तब्बल 22 तास उलटल्यानंतर आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरुच होते. घनदाट जंगल तसेच वन्यप्राण्यांची भीतीमुळे रात्री आग विझवताना अनेक अडचणींना जवानांना समोरे जावे लागले. मात्र ही आग कशी लागली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.