आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goshikhurd Contractor Rama Rao Sponsor Picnic Tour To Maharashtra's FM Mungantiwar

मुनगंटीवारांचा विमान खर्च ठेकेदाराने नव्हे पक्षाने केला- मुख्यमंत्री फडणवीसांचीही सारवासारव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार दिवसापूर्वी एक खासगी विमान भाड्याने घेऊन एका बड्या ठेकेदारासह सहकुटुंब तिरुपती वारी केल्याचे पुढे आले आहे. मात्र, ही बातमी पुढे येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सहकारी मंत्री मुनगंटीवार यांची बाजू घेत त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च भारतीय जनता पक्षाने केला असल्याचे म्हटले आहे.
मुनगंटीवार यांनी शनिवारी पत्नी, सासू, सासरे यांच्यासह तिरूपती वारी केली आहे. तसेच त्यांच्याबरोबर या वारीत त्यांच्यासमवेत गोसीखुर्द प्रकल्पातील एक बडा ठेकेदार व आमदार रामा राव असल्याचे एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. राज्य दुष्काळात होरपळत असताना व त्यामुळे रोज 10-15 शेतकरी आत्महत्या करीत असताना मुनगंटीवार विमानाने सहकुटुंब यात्रेवर गेल्याने विरोधक हिवाळी अधिवेशनात गहजब करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांना साधेपणाचा कानमंत्र देत असताना आणि राज्य सरकार काटकसरीचे धडे गिरवत असताना राज्याच्या अर्थमंत्र्यांने लाखो रुपयांची हवाई सफर करणे कितपत योग्य आहे असाही सवाल उपस्थित होत आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार-रविवार या दोन दिवशी एक खासगी विमान भाड्याने घेऊन सहकुटुंब तिरुपती वारी केली. या वारीत त्यांच्यासमवेत गोसीखुर्द प्रकल्पातील एक बडे ठेकेदार व आमदार रामा राव सहभागी होते. मुनगंटीवार यांच्यासमवेत असलेल्या बड्या ठेकेदारानेच हा खर्च केल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे या वारीचा प्रवास खर्च नेमका कोणी केला याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दोन दिवसांचे विमानाचे भाडे, विमानचालकासह अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा साधारणपणे खर्च हा 15 लाख रुपये आहे. मात्र आपल्या या 'कौटुंबिक' सहलीचा खर्च पक्षाने केल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.
पुढे वाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटले याविषयी...