आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तसेच सिलेक्टर, दोघेही ‘नर्व्हस’ होतो : गौतम गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कधी कधी आपणच आपले स्वत:चे शत्रू असतो. याचा अनुभव प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या गौतम गंभीरला आला. स्वत:च्या क्षमतेविषयी स्वत:च्याच डोक्यात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या गौतमने सुरुवात चौकार, षटकाराने केली आणि नंतर अचानक स्वत:च्या योग्यतेबाबत स्वत:च शंका निर्माण केली आणि त्याची पुनरागमनाची मैफल अचानक बेसुरी झाली.

आपल्या जवळच्या मित्राशी बोलताना गौतम म्हणाला, “मी स्वत: एवढा ‘नर्व्हस’ होतो की, माझ्याविषयीच मला मैदानात शंका यायला लागली. क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यावर आयुष्यात असं प्रथमच घडत होतं.’ सुदैवाने गौतमच्या खांद्याची दुखापत फारशी गंभीर नाही. दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून त्याने ते सिद्धही केले. गौतमच्या निवडीसाठी आग्रही असणारा ‘सिलेक्टर’ही गौतमची फलंदाजी सुरू असताना ‘नर्व्हस’ होता. मैदानावर गौतम ‘ब्लँक’ झाला होता. पुनरागमनाचे दडपण त्याने प्रथमच अनुभवले होते.
तो म्हणत होता, ‘दडपण एवढे प्रचंड होते की, क्षेत्ररक्षण करतानाही हातून छोट्या छोट्या चुका होत होत्या. क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीच्या वेळी एकाग्रताच होत नव्हती.’
गौतमला इंग्लंडविरुद्ध मालिकेआधी स्वत:ला मानसिकदृष्ट्या कणखर करावे लागणार आहे. त्याला आधी स्वत:चे स्थान सलामीचे द्या. मधल्या फळीत ते निश्चित करावे लागेल. के. एल. राहुल, शिखर धवन, मुरली विजय हे सलामीचे फलंदाज असताना त्याला तेथे स्थान मिळणे कठीण दिसत आहे. मधली फळी तर अभेद्यच आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पुजारा, कोहली, रहाणे व रोहित शर्मा यांनीच धावा केल्या आहेत. त्यापैकी पहिल्या तिघांनी शतकेही झळकावली आहेत. त्यामुळे तेथेही शिरकाव होणे कठीण दिसते. फक्त इतरांना झालेली दुखापतच त्याच्यासाठी कसोटी संघातील मार्ग खुला करू शकेल.
धोनीचे अनुकरण करण्याचा सल्ला
मात्र सध्या तो मानसोपचारतज्ज्ञांचाही सल्ला घेत आहे. स्वत:पुढे त्याला धोनीचा आदर्श ठेवण्याचे सुचविण्यात आले आहे. धोनी कधी कधी डोक्याने नव्हे, तर मुक्त विचारांनी, दडपणाशिवाय आणि त्याक्षणी सुचलेल्या गोष्टी करतो. गंभीरला त्याचे अवलोकन करून आकलन करण्यास सांगण्यात आले आहे असे कळते. धोनी अखेरच्या चेंडूवरदेखील षटकार मारू शकतो. तो त्यासाठी स्वत:वर दडपण आणत नाही. तत्काळ निर्णय घेऊन तो अमलात आणतो. अन्य खेळाडूंनीही पुनरागमन कसे केले त्याबाबतही अभ्यास करण्याचा सल्ला त्याला देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...