आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govansh Hatya Bandi: Hearing Start From December In Mumbai

गोवंश हत्याबंदी: आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर डिसेंबरपासून एकत्रित सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात लागू गोवंश हत्याबंदी कायद्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर डिसेंबरपासून एकत्रितपणे सुनावणी केली जाणार आहे. कर्नाटक सरकारने २०१२ मध्ये गोवंश हत्येसंदर्भातील कायदा मंजूर केल्यानंतर आपण एका वर्तमानपत्रात आपली भूमिका मांडली असल्याने हे प्रकरण आपल्यासमोर सुनावणीस ठेवू नये, असे सांगत न्या. गौतम पटेल यांनी या याचिकेवरील सुनावणीस नकार दिला होता.
न्या. अभय अोक आणि न्या. एस.सी. गुप्ते यांचे विशेष खंडपीठ खास या प्रकरणासाठी नियुक्त केले आहे. ५, आणि ११ डिसेंबर अशा तारखा या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आल्या असून गरज भासल्यास आणखी तारखा दिल्या जातील, असे न्या. अोक यांनी स्पष्ट केले.