आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी विमानांना लागली घरघर; नवीन खरेदीचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निलंगा येथील हेलिकाॅप्टर अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुदैवाने बचावले व महाराष्ट्राने सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी याला सरकारी अनास्थाच कारणीभूत असल्याचे दिसून येते. राज्याच्या विमान संचालनालयाकडे खरे तर दाेन विमाने व दाेन हेलिकाॅप्टर अाहेत. मात्र त्यापैकी प्रत्येकी एक नादुरुस्त असून त्याच्या दुरुस्तीचा खर्च माेठा अाहे. त्यामुळे एक विमान व एका हेलिकाॅप्टरवरच सर्व भार पडत अाहे.   
 
नादुरुस्त सरकारी विमान, हेलिकाॅप्टरच्या दुरुस्तीच्या खर्चात नवीन खरेदी हाेऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. यामुळे नवीन विमान व हेलिकाॅप्टर खरेदीचा प्रस्ताव दिलेला अाहे. मात्र त्यासाठी १२० काेटी रुपये लागत असल्याने ताेही धूळ खात पडलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारच्या हवाई सेवेसाठी स्वत: मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. सरकारी कामांसाठी जलदगती  प्रवास करण्यासाठीच या विमानांचा वापर करण्यात येतो. सरकारी विमान उपलब्ध नसल्याने खासगी विमानांची मागणी वाढली अाहे. मात्र त्याचा खर्चही माेठ्या प्रमाणावर वाढत अाहे. गेल्या दाेन वर्षांत फडणवीस सरकारने खासगी विमान कंपन्यांच्या भाड्यापाेटी तब्बल १४ काेटी रुपये माेजले अाहेत. राज्य शिष्टाचार विभागाकडून नवीन विमान खरेदी प्रस्तावाची फाइल तयार करण्यात आली असून ती अजून पुढे सरकलेली नाही. मात्र अाता तरी  त्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर मुख्य सचिवांनी राज्य शिष्टाचार तसेच विमानचालक संचालनालय या दोघांकडून तातडीने अहवाल मागून घेतला आहे.    
 
मुख्यमंत्री ज्या हेलिकाॅप्टरने लातूरवरून मुंबईला निघाले होते ते अमेरिकेच्या सर्कोस्की एस ७६ या कंपनीकडून विकत घेण्यात आले होते. २०११ मध्ये ५२ कोटी देऊन या विमानांची खरेदी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली होती. भारतात अजून विमाने तसेच हेलिकाॅप्टर्स मुख्यमंत्री उद्या देणार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेखासगी कंपन्यांमार्फत बनवले जात नाही अाणि तसे तंत्रज्ञानही अजून विकसित झालेले नाही.
 
बातम्या आणखी आहेत...