आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Announced Department Name And Minister Name Read More Ar Divya Marathi

मुख्यमंत्र्यांकडे गृह-नगर विकास-आरोग्य, खडसेंना महसूल, वाचा कोणाला काय मिळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे)
मुंबई - दोन दिवसांपूर्वी शपथविधी पार पडलेल्या भाजप सरकरचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गृह, नगर विकास, गृहनिर्माण आणि आरोग्य खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. ज्या खात्यांची जबाबदारी कुणावही सोपवण्यात आलेली नाहीत, अशी खातेही फडणवीस यांच्याकडेच राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

असे आहे भाजपचे खाते वाटप -

एकनाथ खडसे - महसूल, अल्पसंख्याक आणि वफ्त, कृषी, पशु संवर्धन, दुग्ध, मत्स व्यवसाय, उत्पादन शुल्क.

सुधीर मुनगंटीवार - अर्थ आणि नियोजन, वन खात्याची जबाबदारी

विनोद तावडे - शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक खाते, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकिय शिक्षण, मराठी भाषा.

पंकजा मुंडे - ग्रामविकास, जलसंवर्धन, महिला आणि बालकल्याण.

प्रकाश मेहता- उद्योग, खाण आणि संसदीय कामकाजमंत्री.

चंद्रकांत पाटील - सहकार, विपणन, टेक्सटाईल आणि सार्वजनिक बांधकाम.

विष्णू सवरा - आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.

दिलीप कांबळे - आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री.

विद्या ठाकूर - ग्रामविकास विभागाच्या राज्यमंत्री.