आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाइन शॉपलाही देवतांची नावे देण्यास सरकारची बंदी; सरकारकडून शॉप अॅक्टमध्ये बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सर्व प्रकारच्या दारू दुकाने व बिअर बारला गड-किल्ले, महापुरुष आणि देवी- देवतांची नावे देता येणार नाहीत. शॉप अॅक्टमधील बदलांनुसार आता वाइन शॉपनाही अशी नावे देता येणार नाहीत. उत्पादन शुल्क आणि कामगार विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडितांनी दारू दुकानांना महापुरुषांची नावे देता येऊ नयेत, असा नियम करण्याची मागणी केली. त्यावर उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व कामगार राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समितीने १५ नोव्हेंबरला अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात नियम बदलाचा निर्णय घेण्यात आला. 

 

यामुळे घेतला निर्णय 
दारू दुकाने शॉप अॅक्टअंतर्गत येत असल्याने त्यांना हा निर्णय सक्तीचा आहे. शॉप अॅक्ट हा १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्यांना लागू होतो. मात्र वाइन शॉपमध्ये ४-५ कर्मचारीच काम करत असल्याने त्यांना शॉप अॅक्ट लागू होत नसल्याचे लक्षात आले. यामुळे वाइन शॉपसाठी नियमात बदल करण्यात येणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...