मुंबई - देशभरातील 27 सरकारी बँकांचे 8 लाख कर्मचारी सोमवार, मंगळवारी संपावर जात आहेत. बँकांच्या 50 हजार शाखांत या दोन दिवसांत कामकाज होणार नाही. वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी हा संप पुकारला आहे. संपात ग्रामीण बँकाही सहभागी होणार आहेत.
बँक कर्मचार्यांच्या मागण्या
सरकारने बँक कर्मचार्यांना दहा टक्के वेतनवाढीची ऑफर दिली होती. या ऑफरवर बँक कर्मचारी संतुष्ट नाहीत. त्यांना किमान 25 टक्के वेतनवाढ हवी आहे. नोव्हेंबर 2012 पासून बँक कर्मचार्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.
या बँक बंद असतील
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इलाहाबाद बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, केनरा बँक, सेंट्रल बँक, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, आईडीबीआई, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक, सिंडिकेट बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनाइटेड बँक, विजया बँक तसेच सर्व ग्रामीण बँक संपात सहभागी असणार आहेत.
या बँक सुरु राहातील
अॅक्सिस बँक, फेडरल बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, यस बँक आणि इतर खासगी बँक. सरकारी बँकांच्या एटीएम मधील पैसे संपल्यानंतर या खासगी बँकांच्या एटीएमचा वापर करता येईल.