आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Employee Strike News In Marathi, Divyamarathi

पाच दिवसांचा आठवड्यास मुख्यमंत्री राजी; कर्मचार्‍यांचा संप मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून सुरु होणारा बेमुदत संप मागे घेण्यात आल्याची घोषणा बुधवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेत सरकारने मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने संप मागे घेतल्याचे महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.

सह्याद्रीवर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पाच दिवस आठवडा किंवा केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता अशी अट ठेवल्यामुळे महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी पाच दिवसांच्या आठवड्यापेक्षा केंद्राप्रमाणे भत्ता मिळण्यासाठी अधिक पसंती दिली.

मान्य केलेल्या मागण्या :
1) 1 लाख, 32 हजार रिक्त पदे भरणार 2) अधिकारी-कर्मचार्‍यांच्या दमबाजी व मारहाणीवर परिणामकारक कायदा दीड महिन्यात 3) केंद्राप्रमाणे वाहतूक, शिक्षण भत्ता मिळणार 4) 80 वयावरील सेवानिवृत्तांना मूळ पेन्शन मध्ये 10 टक्के वाढ 5) ग्रॅच्युइटीची 10 लाखांपर्यंत मर्यादादा 6)

अनुकंपाच्या जागांवर 10 टक्के आरक्षण.
अमान्य झालेल्या मागण्या : 1) सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे 2) पाच दिवसांचा आठवडा 3) बालसंगोपन रजा 4) सर्व संवर्गांना केंद्राप्रमाणे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 5) बदल्यांचे विकेंद्रीकरण 6) प्रशंसनीय कामाबद्दल अतिरिक्त वेतनवाढ 7) केंद्राप्रमाणे बोनस, मागासवर्ग घटकांसाठी सर्व शासकीय सुविधा 8) कंत्राटीकरण रद्द करणे 9) कार्यालयांची थकबाकी रद्द करावी.