आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कर्मचारी करणार तीन दिवसांचा संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
मुंबई - सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १८ ते २० जानेवारीदरम्यान तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. राज्यातील सर्व खात्यांतील एक लाख २० हजार राजपत्रित अधिकारी या तिन्ही दिवशी संपात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत संपाचा निर्णय झाल्याची माहिती संघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली.   

मुंबईत झालेल्या बैठकीत महासंघाचे राज्य पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, सर्व संलग्न संघटनांचे प्रतिनिधी तसेच, जिल्ह्या-जिल्ह्यातून आलेले १५० प्रतिनिधी उपस्थित होते. अधिकारी– कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहेत. प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले जाते परंतु प्रश्न सुटत नाहीत. राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.