आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयपीएलमधून सरकारला पंधरा कोटींचा महसूल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल सामन्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला जून 2010 पासून 25 टक्के करमणूक कर मिळतो, असे स्पष्टीकरण देत राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माहिती घेऊन टीका करावी, असा टोला लगावला.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आयपीएल सामने बंद करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी जालना येथील जाहीर सभेत केला होता. ‘या सामन्यांमधून 12 ते 15 कोटी रुपये प्रतिवर्षी राज्य सरकारला मिळाले असून जास्त तिकीट विक्री झाल्यास उत्पन्न 50 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते,’ असे मलिक यांनी सांगितले. त्यामुळे जे लोक आयपीएलबद्दल बोलतात त्यांनी आधी माहिती घ्यावी, असा टोमणाही त्यांनी मारला.