आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला पद सरकारने दिलेय, मी ते का सोडू ? - गजेंद्र चौहान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एफटीआयच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने माझी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे गजेंद्र चौहान यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पुण्यातील एफटीआयआयच्या चेअरमन पदाच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाला जराही भीक न घालता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, विद्यार्थ्यांचा होणारा विरोध लक्षात घेऊन चौहान यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी. त्यानंतरच हा वाद थांबेल, असा सल्ला अभिनेते ऋषी कपूर यांनी दिला. ऋषी यांचा मुलगा रणबीरनेही आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.